मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा discussion between pruthviraj chavan and sharad pawar

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा

www.24taas.com, झी मिडिया, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

एलबीटी, धनगर समाजाचे आरक्षण यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. लोकप्रिय निर्णय लवकर घेण्यासाठी पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्याचं समजतं.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रश्न सुटत नसल्यानं, अनेक जण थेट शरद पवारांनाच साकडं घालत आहेत.

एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका न घेतल्यानं, फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पवारांची भेट घेतली.

तर धनगर समाजाला आदिवासी वर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करणा-या आमदारांनीही शरद पवारांना भेटून आपलं गा-हाणं मांडलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 12:03


comments powered by Disqus