बलात्कार आरोपींवर कोर्टाजवळ अंड्यांचा मारा, Eggs hurled at Mumbai gang-rape accused outside court

बलात्कार आरोपींवर कोर्टाजवळ अंड्यांचा मारा

बलात्कार आरोपींवर कोर्टाजवळ अंड्यांचा मारा
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

लोअर परळ येथील शक्ती मील परिसरात २२ वर्षीय महिला फोटोग्राफारवर बलात्कार करणा-या पाच आरोपींवर शुक्रवारी किला कोर्टाच्या आवारात अंड्याचा मारा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.

पाच पैकी तीन आरोपींना कोठडीची मुदत संपल्याने किला कोर्टात हजर केले होते. यावेळी आरोपींवर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून अंड्यांचा मारा करण्यात आला. बलात्कारीत एका आरोपीला लवकरच ज्युवेनाइल कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

मुंबई क्राईम ब्रॅंच पोलिसांनी रेखाचित्र जारी करून तीन दिवसांत पाचही आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली. त्या आरोपींपैकी तिघांची पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. ती वाढवून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना आज यालयासमोर हजर केले होते. त्यावेळी संतप्त महिलांनी आरोपींचा निषेध करत त्यांच्यावर अंड्यांचा मारा केला. दरम्यान तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 14:04


comments powered by Disqus