Last Updated: Monday, August 20, 2012, 08:16
www.24taas.com, मुंबईदेशभरात आज रमजान ईदचा उत्साह आहे. सकाळी नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेंकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या महिनाभरापासून उपवास करत मुस्लिम बांधवांनी रोजा पाळलाय.
दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या बाजारपेठांमध्ये रविवारी रंगत पाहायला मिळाली. ईदसाठी खरेदी करण्याकरता मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती. विशेषतः मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवर खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. नुकत्याच सीएसटी इथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबईकरांनी सर्व सण नेहमीप्रमाणे साजरे करावेत, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
First Published: Monday, August 20, 2012, 08:16