सचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक

Last Updated: Friday, November 15, 2013, 11:24

मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.

मुंबईच्या क्रिकेट पंढरीवर सचिन चाहत्यांची अलोट गर्दी

Last Updated: Friday, November 15, 2013, 08:29

क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

Last Updated: Friday, October 18, 2013, 08:10

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:01

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 14:17

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.

चोख बंदोबस्तात... ईद मुबारक!

Last Updated: Monday, August 20, 2012, 08:16

देशभरात आज रमजान ईदचा उत्साह आहे. सकाळी नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेंकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

निवडणूक : राज्यात कडेकोट बंदोबस्त

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 21:33

राज्यातील उद्या होणाऱ्या (दि. १६) मतदानासाठी तब्बल २५ हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मतदानाची पूर्ण तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, उद्या सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

हुश्श... झालं एकदाचं 31st...

Last Updated: Sunday, January 1, 2012, 16:10

मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.