Last Updated: Monday, February 18, 2013, 17:29
www.24taas.com, मुंबईराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा रंगत होती.
मात्र दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना फेरबदलाऐवजी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला परवानगी दिली आहे. त्यामुळं राज्यातल्या राजकारणातल्या घडामोडींना वेग आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आता कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसमधले अंतर्गत गट कमालीचे सक्रिय झाले आहेत.
First Published: Monday, February 18, 2013, 17:29