काँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी

Last Updated: Monday, June 2, 2014, 13:37

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच

Last Updated: Sunday, June 1, 2014, 12:57

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.

काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Last Updated: Sunday, June 1, 2014, 09:19

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:53

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.

राज्यमंत्रीमंडळाचा होणार विस्तार!

Last Updated: Monday, February 18, 2013, 17:29

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा रंगत होती.

टीम मनमोहन जाहीर, शरद पवार तिसरेच

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 14:01

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून टीम मनमोहन जाहीर करण्यात आली आहे. टीम मनमोहनमध्ये 33 जण सदस्य आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर!

Last Updated: Sunday, April 22, 2012, 11:26

काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलय. कॅबिनेटच्या एकंदर चार जागा रिक्त आहेत. त्यातल्या काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन जागा आहेत.

दिल्ली भेटीत ठरल, राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार..

Last Updated: Saturday, April 21, 2012, 22:15

राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीभेटीत हायकमांडने विस्ताराला परवानगी दिल्याचं मानलं जात आहे. तसंच बऱ्याच काळ रखडलेल्या महामंडळावरच्या नियुक्त्यांची यादीही मुख्यमंत्र्यांनी सोनियांकडे सोपवल्याचे समजते.