फेसबुक प्रकरण: शिवसेनेची भीती तरूणीला, facebook matter Shahin dhada leave maharashtra

फेसबुक प्रकरण: शिवसेनेची भीती तरूणीला

फेसबुक प्रकरण: शिवसेनेची भीती तरूणीला
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर `मुंबई बंद`बाबत `फेसबुक`वर टिप्पणी करणारी शाहीन धाडासह तिच्या कुटुंबियांनी महाराष्‍ट्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धाडा परिवाराने काही वर्षे गुजरातमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस प्रशासनाचे आठमुठे धोरण आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या भीतीमुळे शाहीनच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

शाहीन आपल्या कुटुंबियांसोबत पालघर येथे राहते. शाहीनने सांगितले की, धाडा कुटूंबावर सध्या भीतीचे सावट पसरले आहे. आम्हाला आता केवळ शांती हवी आहे.

त्यामुळे धाडा कुंटुबिय येत्या रविवारी महाराष्‍ट्र सोडून गुजरातमध्ये स्थलांतर करणार आहे. हे काही वर्षांसाठी असेल असेही शाहीन हीने सांगितले.

First Published: Friday, November 30, 2012, 18:29


comments powered by Disqus