Last Updated: Monday, June 23, 2014, 11:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईयूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईनं पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’असं स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारनं एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे.
पैशांची चणचण भासत असल्याचं सांगत रेल्वेनं १४.२ टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही भाडेवाढ योग्य नसल्याची प्रतिकिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यासाठी मुंबई आणि ठाण्यातील खासदार रेल्वेमंत्रांना भेटतील. यावर लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बोरिवलीत एका तलावाच्या शुशोभिकरणाचं उदघाटन झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिकिया दिली. इतर पक्षांना आंदोलन करायचा हक्क नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेते विनोद तावडे यांनीही रेल्वे दरवाढीबाबत फेरविचार होईल, अशी आशा व्यक्त केलीये. ट्विटरवर त्यांनी प्रतिक्रीया दिलीये. मुंबईकरांसाठी ही दरवाढ खूप आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी आम्ही या विषयावर बोललो आहोत. त्यांनी रेल्वेमंत्री, अर्थमंत्री आणि पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलंय.
त्यामुळं मोदी सरकारनं दरवाढ केली असली लोकांचा विरोध बघता आता त्याला शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपमधूनच विरोध होतांना दिसतोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 22, 2014, 22:53