तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार, Bapanam be around 11 years girls rape,

तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार

तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार
तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय. अशा गलिच्छ आणि ‘वडील’ या नात्यास काळीबा फासणाऱ्या प्रकारामुळं त्याच्या पत्नीनं त्याला सोडलं असून ती कोलकात्याला निघून गेली. इब्राहिम खान (५०) या विकृत बापास मालवणी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे.

पीडित मुलीनं सांगितलं की, “मालवणी इथं राहणारा इब्राहिम खान मी १४ वर्षाची असल्यापासून माझ्यावर सतत अत्याचार करुन मला मारहाणही करत असे. माझं लग्न होऊ नये म्हणून गुन्हेगार इब्राहिम हा बघायला येणाऱ्या मुलांकडे मोठ्या प्रमाणावर हुंडा मागत होता. त्यामुळं त्या पीडित मुलीचं लग्न जमत नव्हतं. सतत अत्याचार केल्यामुळं त्या पीडित मुलीला गर्भधारणा झाली. या कीळसवाण्या प्रकारामुळं त्याची पत्नी कोलकात्याला निघून गेली. काही काळानं पीडित मुलीला या अत्याचारातून मुलगी झाली. ती मुलगी आता आठ वर्षांची आहे. या अत्याचाऱ्याला कंटाळून पीडित मुलगी कोलकात्याला तिच्या गावाला निघून गेली”.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी आणि तिची आई कोलकात्याहून मुंबईला आल्यावर इब्राहिम विरुद्ध त्यांनी महिला दक्षता समितीच्या मदतीनं तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी इब्राहिम खानला अटक केली. पोलिसांकडून इब्राहिमचे अजून काही काळे धंदे समोर आले आहेत. त्यामध्ये इब्राहिम हा आग्राहून मुली आणात असे आणि त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडत असे. तसंच तो बनावट पॅनकार्ड देखील बनवत होता. त्यामुळं त्यानं आपली मुलगी हीच आपली पत्नी असल्याचं बनावट पॅनकार्ड देखील तयार केलं होतं, अशा काही बाबी समोर आल्या आहेत.














इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013, 16:44


comments powered by Disqus