६१ टक्के सूनांकडून सासू-सासऱ्यांवर अत्याचार

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 21:52

एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय.

मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी पत्नीचा छळ

Last Updated: Friday, May 30, 2014, 14:27

प्रमोशनसाठी पत्नी अब्रूचा सौदा करणाऱ्या आणि मित्रांसोबत ग्रुप सेक्ससाठी त्रास देणाऱ्या पतीला भोपाळ महिला पोलिसांनी अटक केली आहे. पती एका खासगी कंपनी वरिष्ठ पदावर काम करीत आहे. पण आरोपी विनोय नायर २० हजार रुपयांच्या जामीनावर तात्काळ सुटला.

एकट्या यवतमाळमध्ये ३००हून अधिक कुमारी माता

Last Updated: Thursday, December 26, 2013, 21:17

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये महिला-मुलींवर होणारे बलात्कार आणि अत्याचाराने सरकार हादरते... मग यवतमाळच्या दूर्गम भागातील वासनेच्या शिकार झालेल्या ३०० हून अधिक आदिवासी तरुणींबाबत कुणीच का बोलत नाही?

तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार

Last Updated: Friday, November 29, 2013, 17:16

मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय.

...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 19:59

एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्रास दिल्यास त्या मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च व्याजासकट वसून केला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

धर्मांतराची जबरदस्ती करत पत्नीवर ब्लेडचे १०० वार!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 16:25

मुंबईमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर धर्मांतराची जबरदस्ती करत अनन्वित अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आधी फेसबुकवर मैत्री करून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि नंतर मुलीशी लग्न करून तिला इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती त्याने केली.

मुंबईत होतोय ज्येष्ठ नागरिकांचा छळ!

Last Updated: Sunday, June 16, 2013, 22:27

आज `फादर्स डे` सगळीकडे साजरा होत असताना ज्येष्ठ व्यक्तींचा छळ होत असल्याचं आणि त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. विशेष म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत हे प्रमाण सर्वाधिक आहेत...

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ

Last Updated: Monday, March 18, 2013, 22:20

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.

पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कळस

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 22:59

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या असंवेदनशिलतेचा आणि बेजबाबदारपणाचा प्रत्यय आलाय. या दोन पोलीस अधिका-यांच्या बोलण्यात नसलेली एकवाक्यता बाळू चंदनशिवे या तरुणावर झालेला अन्याय सांगण्यासाठी पुरेशी आहे.

पोलिसांच्या छळाला वैतागून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated: Monday, December 17, 2012, 20:16

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.

ऑफिसमध्ये महिलाच नाही पुरुषांसोबतही लैंगिक अत्याचार

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 22:25

महिलांवर कार्यालयात लैगिंक अत्याचार केले जातात, त्यामुळे महिलांसाठी कायदाही करण्यात आला. मात्र फक्त महिलांवरच लैगिंक अत्याचार नाही तर पुरूषांवरही लैगिंक अत्याचार होतात.