मुंबईकरांनो `नायडू सिस्टर्स`पासून सावधान! Females Theft gang arrested in Mumbai

मुंबईकरांनो `नायडू सिस्टर्स`पासून सावधान!

मुंबईकरांनो `नायडू सिस्टर्स`पासून सावधान!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सासू, सून, नणंद, भावजय आणि भाची असं एक अख्खं कुटुंब आणि चोरटं... आठ महिलांच्या या टोळीनं मुंबईकरांना जोरदार हिसका दाखवलाय. तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर सावध रहा.

बेस्ट बसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी आहे. प्रवाशांना या महिलांनी लाखोंचा चुना लावलाय. या
घोळक्यानं येतात आणि प्रवाशांची लूट करतात. अन्नपूर्णा नायडू, कलावती नायडू, पल्लवी नायडू, कविता नायडू, सिता नायडू, सिध्दम्मां नायडू, यमलता नायडू आणि कल्याणी नायडू या सगळ्या एकाच कुटुंबातल्या महिला आहेत. सासू, सुन, नंणंद आणि भाची अशी यांची एकमेकांशी नाती आहेत.

सध्या या महिल्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकाच कुटुंबातल्या महिलांची ही टोळी बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटायची. तुम्ही जर या महिलांकडे पाहिलंत, त्यांचा पेहराव पाहिलात तर तुम्हाला वाटेल की, या महिला अतिशय गरीब आहेत पण त्या एक नंबरच्या बनेल आहेत.

अशी करायचे चोरी

या महिला चोरी करण्यासाठी किंवा पाकिट मारण्यासाठी त्यांच्या जवळच्या लहान मुलांचा वापर करायच्या. या महिला विशेषतः बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना टार्गेट बनवायच्या. लहान मुलं जवळ असल्याचा फायदा घेत महिलांशी ओळख करुन हातचलाखीनं त्यांच्या पर्स, दागिने लंपास करायाच्या. पुरुष प्रवाशांची पाकिटं आणि हातातली अंगठीसुद्धा चोरायच्या.

या महिला सर्व दक्षिण मुंबई परीसरात सतत ठिकाणं बदलत राहत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या चोरी करणाऱ्या महिला कुटुंबासारखीच अनेक कुटुंब मुंबईत राहतायेत. आता अशा कुटुंबांचा शोध सुरू झालाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 11:25


comments powered by Disqus