Last Updated: Tuesday, June 25, 2013, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्यावरून महापालिकेत खडाजंगी झालीय. सत्ताधारी शिवसेना-भाजपनं रेसकोर्सच्या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केल्यामुळं विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रेंनी महापौरांच्या टेबलावर बांगड्या फेकल्या. त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव शीतल म्हात्रेंवर धावून गेल्या. य़ा दोघींमध्ये धक्काबुक्की झाल्यानं वातावरण आणखीनच चिघळले, त्यामुळं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
काँग्रेस नगरसेविकेच्या या कृत्यामुळे काँग्रेसने महापालिकेचा अपमान केला आहे. आपल्या अंगाला हात लावून शीतल म्हात्रे अत्यंत निंदनीय भाषा वापरून बोलल्याचं महापौरांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे नौटंकी करून काँग्रेस नगरसेविकांनी सभागृहाचा अपमान केल्याचं महापौरांनी म्हटलं आहे.
महापौरांचा अपमान हा मुंबईच्या सव्वा कोटी लोकसंख्येचा अपमान असल्याचं म्हणत महापौरांनी शीतल म्हात्रेंचा निषेध केला. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची सूचनाही त्यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 18:17