Last Updated: Tuesday, October 16, 2012, 18:20
www.24taas.com, मुंबई`चिकनी चमेली` या गाण्याने सगळीकडे एकच धुमाकूळ घातला असताना मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील विलास बारमध्ये या गाण्यामुळे चांगलाच राडा झाला. गाण्याचा वादावरून गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबाराप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
हे चौघेही बेकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रवीवारी मध्यरात्री घडली. हे चौघे आरोपी जोगेश्वरी लिंक रोड येथील विलास बार आणि रेस्टॉरन्टमध्ये दारू पिण्यासाठी आले. तेव्हा वेटरने बार मॅनेजर आणि बार सिंगरला “चिकनी चमेली’ गाण्याची विनंती केली.
मात्र ते गाणं गाण्यास नकार दिल्याने आरोपीने हवेत गोळीबार केला. आणि मॅनेजर आणि बार सिंगरला धमकी दिली. पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेऊन चारही आरोपींना अटक केली.
First Published: Tuesday, October 16, 2012, 18:12