Last Updated: Friday, June 21, 2013, 13:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रु भागात मुंबई पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. मुख्य म्हणजे, या सेक्स रॅकेटमध्ये ‘सास-बहू’ मालिकांमध्ये काम करणाऱ्या ५ प्रख्यात अभिनेत्रींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील ४ अभिनेत्री टीव्हीवरील डेली सोप मालिकांमधील प्रख्यात अभिनेत्री असल्याची माहिती मिळाली आहे.
या सेक्स रॅकेटमध्ये अनेक बड्या हस्ती गुंतल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सेक्स रॅकेट चक्क एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरात चालू होतं. मॉडेल को-ऑर्डिनेटर असणारा इम्तियाज खान या सेक्स रॅकेटचा दलाल असल्याचं समोर आलं. या इम्तियाज खानने १ लाख रुपयांवरून २५ हजारांचा सौदा कबुल केला होता. पोलिसांनीच ग्राहकांचं सोंग घेऊन लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नं. १४०२ मध्ये प्रवेश केला. याच फ्लॅटमध्ये या ५ अभिनेत्री होत्या. या सेक्स रॅकेटला पोलिसांनी अटक केली आहे.
हा फ्लॅट एका आयएएस ऑफिसरच्याच मालकीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट चालवल्यामुळे कुणाला शंका येणार नाही, असा अंदाज होता. या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये टीव्ही मालिकांमधील ५ प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी होत्या. यातील ४ अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये गाजलेल्या आहेत. तर एक अभिनेत्री भोजपुरी सिनेमांमधील हिरोइन आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतरही बड्या लोकांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 21, 2013, 13:17