कचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ, Four-day-old girl abandoned in Mumbai dustbin

कचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ

कचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ
www.24taas.com, मुंबई

माणुसकीला काळिमा फासणारा आणखी एक प्रकार आज समोर आलाय. मुंबईत अवघ्या चार दिवसांची मुलगी कचरा पेटीत आढळून आली. सांताक्रूजच्या मिलन सबवेमध्ये या चिमुरडीला कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं.

गुरूवारी संध्याकाळी पाच वाजल्याच्या सुमारास कचरा पेटीतून रडण्याचा आवाज आला. एका कपड्यात गुंडाळलेल्या या चिमुरडीचं रडणं थांबत नव्हतं. आजुबाजुच्या लोकांनी कचऱ्याच्या डब्यात डोकावलं त्यावेळी हे बाळ आढळलं. त्यांनी कचरा पेटीतून या बाळाला उचलून तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

चार दिवसांच्या या कोवळ्या जीवाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. या बाळाच्या आई-वडिलांचा पोलिसांनी तपास सुरू केलाय.

First Published: Friday, February 8, 2013, 13:16


comments powered by Disqus