न्यू शंकरलोक इमारत दुर्घटनेत ७ ठार, ५ जखमी

Last Updated: Friday, March 14, 2014, 21:52

मुंबईतल्या वाकोल्यात न्यू शंकरलोक ही सात मजली इमारत आज सकाळी साडे आकराच्या सुमारास बाजूच्या कॅतरीन चाळीवर कोसळली. या दुर्घटनेत एकूण सात ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य सुरूच आहे.

वाकोला दुर्घटना : कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार - महापौर

Last Updated: Friday, March 14, 2014, 17:53

महापौर सुनील प्रभू यांनी वाकोल्यातल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट दिली आणि मदतकार्याची पाहाणी केली. या घटनेला कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार आहेत, असा आरोप महापौर प्रभू यांनी केलाय. दरम्यान, या घटनेला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुनयना पोतनिस यांनी केलाय.

मुंबईत दारूसाठी आईलाच भोसकले

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 08:51

घोटभर दारूसाठी त्याने आपल्या जन्मदात्या आईलाच भोसकल्याची घटना मुंबईतील वाकोला येथे घडली. याप्रकरणी मुलाला वाकोला पोलिसांनी अटक केलेय. मुलाने हिंदी चित्रपटाचा असिस्टंच डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

मैत्रिणीने मद्य दिले, मित्रांनी केला बलात्कार

Last Updated: Saturday, April 27, 2013, 10:03

मुंबईतील वाकोल्यात धक्कादायक आणि संजापजनक घटना घडलेय. एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केला. यामध्ये या मुलीच्या मैत्रिणाचा हात होता, ही धक्का देणारी बाब पुढे आली आहे.

कचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ

Last Updated: Friday, February 8, 2013, 13:16

माणुसकीला काळिमा फासणारा आणखी एक प्रकार आज समोर आलाय. मुंबईत अवघ्या चार दिवसांची मुलगी कचरा पेटीत आढळून आली. सांताक्रूजच्या मिलन सबवेमध्ये या चिमुरडीला कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं.

वसंत ढोबळे - सिंघम की दबंग?

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 15:38

धडक कारवाईमुळे मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढेच ते आपल्या खास कार्यपद्धतीमुळे वादग्रस्तही ठरले आहेत. बार आणि हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचीची तर त्यांची चांगलीच धास्ती घेतली होती. आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत.

वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेचा विरोध

Last Updated: Sunday, January 13, 2013, 22:02

मुंबईचे `हॉकी कॉप` म्हणून ओळखले जाणारे एसीपी वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेनंही विरोध केलाय. दोन दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईवेळी एका फेरीवाल्याचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये.