Last Updated: Tuesday, October 22, 2013, 09:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.
अनुराधा कशेळकर ही महिला युवा सेनेची पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून आजपर्यंत वावरत होती. पण आता या महिलेचा खरा चेहरा समोर आलाय. अनुराधा सध्या डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. कारण आपण इन्कम टॅक्स विभागात असिस्टंट कमिशनर असल्याचं सांगून तिनं एका व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा घातलाय, अशी माहिती एसीपी अनंत जाधव यांनी दिलीय.
अनुराधासह राज शेख आणि नरेश गायकवाड या दोघांनाही पोलिसांनी अटक केलीय. अनुराधा आणि तिच्या दोन साथीदारांना २४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अनुराधानं अनेकांना फसवल्याचा संशय आहे. त्याबद्दल पोलीस आणखी तपास करतायत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 21, 2013, 23:37