चला इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याची संधी!

Last Updated: Thursday, January 23, 2014, 13:10

मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.

अनुराधा कशेळकर आमच्या पदाधिकारी नाहीत, युवा सेनेचा दावा

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 10:04

इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिली होती. मात्र, ही महिला कोणत्याही पदावर नव्हती. त्यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नाही. त्या युवा सेनेच्या सक्रिय सदस्यदेखील नाही, असा खुलासा युवा सेनेकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या युवा सेनेची बनावट महिला इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला अटक

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 09:41

इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचं सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या महिलेचं नावं अनुराधा कशेळकर आहे. ती शिवसेनेच्या युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.

भामटा इन्कमटॅक्स अधिकारी...

Last Updated: Friday, July 13, 2012, 23:11

अंबर दिव्याची गाडी,इन्कमटॅक्स अधिकारी म्हणून बढतीचा शासनाचा बनावट आदेश,तसच स्वत:चं खोटं ओळखपत्र बनवून भर रस्त्यावर लोकांना थांबवून लूट करणारा ठकसेन इन्कमटॅक्स अधिका-याला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय.