Last Updated: Sunday, August 11, 2013, 09:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमरीन ड्राइव्ह पोलिसांनी अशा एका आरोपीला अटक केलीय ज्यानं गावची गहाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी स्वतःच्या बहीणीच्या नव-याला एक दोन नाही तर तब्बल 10 लाखांचा गंडा घातलाय..झटपट पैसे कमाविण्याच्या नादात त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे जितेंद्र पांडे..जितेंद्रला पैशाची हाव चांगलीच नडलीय.पैशाच्या हव्यासामुळे आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.जितेंद्रनं आपल्या भावजीला थोडथोडका नाही तर तब्बल 10 लाखांना गंडवलय..आरोपी जितेंद्रनं आपल्या भावजीकडून 10 रुपये चोरी करुन बिहारला पोबारा केला होता..मात्र पोलिसांनी तपास करुन आरोपीला अखेर गजाआड केलय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी जितेंद्र पांडे हा पैसे कमाविण्यासाठी पाच वर्षापूर्वी मुंबईत आपल्या बहिणीकडे राहायला आला होता.त्याची हुशारी बघून त्याच्या भावजीने जितेंद्रला आपल्या व्यवसायात सोबत ठेवलं होतं..मात्र जितेंद्रची हुशारी त्याला चांगलीच नडलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जितेंद्र पांडे आणि त्याचा भावजी संतोष हे 22 एप्रिलला मरीन ड्राईव्ह इथल्या स्टेटस हॉटेलमध्ये गेले होते..गाडीत ठेवलेल्या 10 लाखाच्या रकमेवर नजर ठेऊन सांगून जाणा-या संतोषला मात्र चांगलच महागात पडलय..कारण आरोपी जितेंद्रनं भावजी संतोषचा विश्वासघात करत 10 लाखांची रक्कम घेउन घटनास्थळावरुन पोबारा केला होता.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपी जितेंद्र पांडेला बिहारच्या बक्सरमधून अटक केलीय.पोलिस जेव्हा आरोपी जितेंद्रला अटक करण्यासाठी बिहार गेले तेव्हा त्यांच्या समोर वेगळीच हकीकत समोर आली होती..कारण आरोपीच्या वडिलानी आपल्या जावयावर जितेंद्रचं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती.मात्र सत्य परिस्थीती समोर येताच तिथल्या पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 11, 2013, 09:30