Last Updated: Saturday, April 27, 2013, 10:03
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईमुंबईतील वाकोल्यात धक्कादायक आणि संजापजनक घटना घडलेय. एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केला. यामध्ये या मुलीच्या मैत्रिणाचा हात होता, ही धक्का देणारी बाब पुढे आली आहे.
दिल्ली आणि रांचीमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेपाठोपाठ महाराष्ट्रही महिला आणि मुलींसाठी सुरक्षीत नसल्याचे मुंबई आणि राज्यातील अनेक घटनांतून दिसून आले आहे.
वाकोला येथे सायंकाळी पीडित मुलीची मैत्रिण तिला मित्रांच्या घरी घेऊन गेली. माझ्या सोबतीला चल असे सांगून ती पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन गेली. त्या ठिकाणी आगोदरच चार जण हजर होते. या सहा जणांनी गप्पा-गोष्टी केल्या आणि नंतर मद्यप्राशन केले. मैत्रिणीसोबत गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीनेही मद्य घेतले होते.
अतिमद्यसेवनामुळे ती बेशुद्ध झाल्यानंतर त्या खोलीत असलेल्या चार मुलांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पीडिते मुलीची मैत्रीण आणि चौघे फरार झालेत
पोलिसांनी घटनास्थळाहून रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत नालासोपारा येथे सावत्र वडीलांनी मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी मुख्तार शेखला पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Saturday, April 27, 2013, 10:03