Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:54
www.24taas.com, मुंबई दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला असताना देशातच्या विविध भागातून सामुहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहे. देशाच्या राजधानीनंतर आता आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मानखुर्द भागातील मुकबधीर मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
१५ वर्षीय या मूकबधीर मुलीवर दोघा नराधमांनी सामुहिक बलात्कार शिकार बनली आहे. काल संध्याकाळी या मुलीवर बलात्कार झाला. या मुलीला वैद्यकीय तपासण्यांसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मानखुर्द येथील एका आश्रमातील ही मुलगी आहे. काल या मुलीला एकटे हेरुन नराधमांनी डाव साधला. हे इसम नेमके कोण होते याचा अद्याप पोलिस तपास करीत आहे. याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हे दोघेही आजूबाजूच्या परिसरात राहणारे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही मुलगी सध्या राजावाडी रुग्णालयात दाखल आहे. तेथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
First Published: Thursday, December 27, 2012, 18:47