Last Updated: Friday, September 6, 2013, 15:37
www.24taas.com झी मीडिया, मुंबईमुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींचे नवीनवीन कारनामे पुढे येताय आहे. या सहा आरोपींपैकी एक सिराज रेहमान यानं धोबीघात परिसरातल्या एका टीबी पेशंट महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या महिलेनं वेळीच आरडाओरडा केल्यानं पुढला प्रसंग टळला.
दोनच दिवसांपुर्वी या महिलेचा मृत्यू झालाय. पोलीसांनी या प्रकरणी सिराजवर बलात्काराचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलाय. तर याआधी मुंबई गँगरेप प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. महालक्ष्मीच्या शक्तीमील कम्पाऊंडमध्ये गँगरेप करणाऱ्या ८ जणांची टोळीच असल्याचं पुढे आलं होतं. त्यानंतर आता या टोळक्यानं १० महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. तर यातील एका आरोपीने टीबी पेशंट महिलेलाही सोडले नाही, असे धक्कादायक पुढे आले आहे.
यात पाच गँगरेपच्या घटना आहेत. फोटो जर्नलिस्टवर झालेल्या बलात्कारानंतर या टोळीची कृष्णकृत्य जगासमोर आली. त्यानंतर ३१ जुलैला याच टोळक्यानं गँगरेप केलेली आणखी एक तरुणी पुढे आली. या तक्रारीनंतर आणखी तिघंजण यात असल्याचं स्पष्ट झालंय. यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून टोळक्यातले अन्य दोन साथीदार फरार आहेत.
२२ ऑगस्टला शक्ती मिल कंपाऊंडमध्ये आपल्या सहकाऱ्याबरोबर कामानिमित्त गेलेल्या महिला फोटोग्राफरवर गँगरेप झाला. त्यानंतर सलिम अन्सारी, विजय जाधव, मोहम्मद कासिम, कासिम बंगाली आणि सिराज रेहमान या पाचही आरोपींना अटक करण्यात आली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, September 6, 2013, 15:28