Last Updated: Friday, September 6, 2013, 11:38
www.24Taas. झी मीडिया, ठाणेइच्छापूर्तीचा ताविज बनवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे.
अभ्यासात लक्ष लागत नसल्याने ही तरुणी निराश झाली होती.. नखं आणि केसाचा ताविज बनवल्यास मनातल्या इच्छा पूर्ण होतील असा सल्ला तिला देण्यात आला होता. त्यानुसार नदीम नावाच्या तरुणाने मौलवीकडे नेण्याच्या बहाण्याने तरुणीला गुंगीचे औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
या नराधमाचं कृत्य यावरच थांबलं नाही. त्याने तिचे विवस्त्र फोटो काढले आणि ते फेसबुकवर टाकण्याची धमकी देत नदीम शेखने तिच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. या तरुणीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या भोंदूगिरी करणा-या आरोपीला अटक केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, September 6, 2013, 11:35