Last Updated: Tuesday, October 1, 2013, 10:57
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईभांडूपमध्ये काल रात्री अकराच्या सुमारास एका क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झालाय. एका जुगाराच्या अड्ड्यावर झालेल्या या गोळीबारात संतोष चव्हाण उर्फ संतोष काण्या हा जागीच ठार झालाय. तर जमालुद्दीन सत्तार जखमी झालाय.
मृत संतोषवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दोन गटांमध्ये झालेल्या या गोळीबारामुळं मुंबईत पुन्हा गँगवॉर सुरू झाल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काल रात्री अज्ञातांनी भांडूपमधील साई हिल रोडवरील एका चाळीत घुसून संतोष चव्हाणवर पाच गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जिथं ही घटना घडली तिथं संतोष चव्हाण अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवत होता. याच कारणावरुन दुसऱ्या गटानं त्याची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 10:56