अर्धवट जळालेल्या अवस्थेत झुडुपांत आढळला `ती`चा मृतदेह

Last Updated: Thursday, January 16, 2014, 23:37

गेले अनेक दिवस गायब असलेल्या इस्टर अनुया या तरुणीचा मृतदेह भांडुपजवळ इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका झुडुपात आढळलाय. अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे एकच खळबळ उडालीय.

भांडूपमध्ये गँगवॉर, गुंड संतोषची काण्याची हत्या

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 10:57

भांडूपमध्ये काल रात्री अकराच्या सुमारास एका क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झालाय. एका जुगाराच्या अड्ड्यावर झालेल्या या गोळीबारात संतोष चव्हाण उर्फ संतोष काण्या हा जागीच ठार झालाय. तर जमालुद्दीन सत्तार जखमी झालाय.

आत्महत्या करायला गेली, पण मुलीला गमावलं!

Last Updated: Friday, August 9, 2013, 16:01

आत्महत्या करायला गेलेल्या मातेनं आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलंय. भांडूपच्या कोकणनगर परिसरात राहणाऱ्या गावकर कुटुंबाच्या दुर्दैवाची ही कहाणी...

भांडूपमध्ये भाजप कार्यकर्त्याची भोसकून हत्या

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 09:42

भांडुपमधील भाजप कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या हत्येप्रकरणी बबन तुकाराम खोपडे या संशयिताला अटक करण्यात आली आहे. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अससेसे वसंत पाटील हे आरटीआय कार्यकर्तेही होते.

धावत्या ट्रेनमधील दोघे गंभीर जखमी

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:50

मुंबईत धावत्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांची एकमेकांना धडक बसली आणि यात दोघेजण गंभीर जखमी झालेत. दौलत शिवसुंदर आणि सागर भोर, अशी या तरुणांची नावे आहेत.

आरपीआय करणार आज रेलरोको

Last Updated: Monday, December 19, 2011, 04:01

डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.