Last Updated: Tuesday, October 15, 2013, 08:57
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसिलिंडरचं बुकींग केल्यानंतर त्याची प्रतीक्षा करण्याचे दिवस आता इतिहास जमा होणार आहेत. गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभारावर चाप बसवण्यासाठी तेल कंपन्या पुढे सरसावल्यात. यासाठी त्यांनी रेटिंग पद्धत सुरु केलीय. काय आहे ही रेटिंग पद्धत?
सरकारी गॅस कंपनींनी ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत मानांकन पद्धत सुरु केलीय. यानुसार ठराविक मुदतीत गॅसची डिलेव्हरी न देणा-या गॅस एजन्सीला खराब रेटिंग देण्याचं अस्त्र ग्राहकांना देण्यात आलंय. गॅसची नोंदणी केल्यानंतर २ दिवसात सिलिंडर मिळाल्यास ५ स्टार, ४ दिवसानंतर ४ स्टार , ६ दिवसानंतर ६ , ८ दिवसानंतर २ तर ८दिवसापेक्षा जास्त दिवसांचा अवधी घेणा-या एजन्सीला एक स्टार देता येईल. ज्या गॅस एजन्सीचं रेटींग सातत्यानं खराब असले त्याला सुरुवातीला दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही कामकाजात प्रगती न करणाऱ्या एजन्सीचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.
या गॅस एजन्सीला रेटिंग देण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. यासाठी ग्राहकांना तेल मार्केटींग कंपनीच्या ट्रास्परन्सी पोर्टलवर जाऊन डीलरची निवड करावी लागेल.या पोर्टलवरुन गॅस एजन्सीचे रेटिंग ग्राहकांना पाहता येतील. तसेच ज्या एजन्सीचे रेटिंग चांगलंय त्या एजन्सीला कनेक्शन शिफ्ट करण्याची सुवीधाही ग्राहकांना आहे. गॅस वितरकांनी मात्र या योजनेवर नाराजी व्यक्त केलीय.
गॅस एजन्सींच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी तेल मार्केटिंग कंपन्यांचे हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे. आता या अस्त्राचा प्रभावी वापर केला तर ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकतो, हे या रेटिंग पद्धतीमुळे शक्य होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 08:51