कोकणचा विकास कुठं? शरद पवारांचा सरकारला घरचा आहेरGloble Kokan Festival in Navi Mumbai, Sharad Pawar

कोकणचा विकास कुठं? शरद पवारांचा सरकारला घरचा आहेर

कोकणचा विकास कुठं? शरद पवारांचा सरकारला घरचा आहेर
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

निसर्गानं दोन्ही हातानं सौंदर्य बहाल केलेल्या कोकणाचा हवा तसा विकास झालेला नाही.. कोकणचा पर्यटन विकास होणं गरजेचं असून त्यासाठी महामार्ग आणि जलमार्गाचाही विकास होणं महत्वाचं असलंयाचं म्हणत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला घरचाच आहेर दिलाय...

यावा कोकण आपलाच असा... अशी हाक देणाऱ्या कोकणाचा इतर पर्यटन स्थळांप्रमाणं विकास होणं अत्यंत गरजेचं आहे... आणि तो झालेला नाही हे राज्य सरकारचं अपयश असल्याचं स्पष्ट आहे.. कोकण भूमी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल कोकण महोत्सवात शरद पवारांनी राज्य सरकारला असा घरचाच आहेर दिला...

जैतापूर प्रकल्प हा कोकणाच्या विकासासाठी महत्वाचा असून जैतापूर प्रकल्प निसर्गाला हानीकारक नसून त्यामुळं राज्यबरोबरच कोकणाचाही फायदाच होईल असं मत त्यांनी मांडलं.. कोकणात ३ लाख हेक्टर जमीन ही फळ बागायती खाली असून शेती बरोबरच इतरही जोड उद्योग विकासासाठी महत्वाचे असल्याचंही पवारांनी सांगीतलं.

याच कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार आणि कोकण महोत्सवाचे आयोजक भाई जगताप यांनीही कोकणाकडं शासनाचं दुर्लक्ष झाल्याचं मान्य करत कोकणात हव्या तशा योजना राबल्या गेल्या नाहीत हेही मान्य केलं...

यावेळी महोत्सवात कोकण उद्योजकांचा खास सत्कारही करण्यात आला. मसाला किंग म्हणून ओळख असलेल्या आणि आपला व्यापार दुबई पर्यंत नेलेल्या धनंजय दातार, उद्योजक हसन चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.. कोकणाचा विकास झाल्यास कोकणात उद्योगाला आणि उद्योजकांना चालना मिळेल असं मत या उद्योजकांनी मांडलं...

महोत्सवात नवी मुंबई बिल्डर असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं उद्धाटनही पवारांच्या हस्ते करण्यात आले... या प्रदर्शनात जनतेला रास्त दरात घरं उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन बिल्डर असोसिएशन तर्फे देण्यात आलं...



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 22:36


comments powered by Disqus