Last Updated: Monday, July 29, 2013, 18:50
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबईतमधील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी भाजपच्यावतीने वरळीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
वरळी, नायगाव, शिवडी आणि लोअर परेल इथल्या बीडीडी चाळींमधल्या घरांममध्ये अनेक वर्षांपासून पोलीस राहत आहेत. या घरांची मोठ्याप्रमाणात दूरवस्था झाली आहे. पोलिसांना राहायला चांगले घर मिळावे तसेच पोलिसांच्या घरांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी या मोर्चाच्या वेळी केली.
गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली शकडो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात घोषणाही देण्यात आल्या. मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. शेकडो पोलिसांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले. मुंबईतील वाहतुकीवर याचा परिणाम दिसून आला. या मोर्चामुळं वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
पाहा व्हिडिओ •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, July 29, 2013, 18:50