...तर मुलांच्या शिक्षणावर खर्च झालेले पैसे व्याजासकट घ्या! health card for old people

...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!

...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्रास दिल्यास त्या मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च व्याजासकट वसून केला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सोयी मिळाव्यात यासाठी इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड तयार करावं अशी सूचना शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वृद्धाच्या समस्येवर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत हेल्थ कार्डाचा मुद्दा पुढ आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या हेल्थ कार्डामध्ये व्यक्तीचं नाव, वय, पत्ता, रक्तगट यांची माहिती असावी. तसंच मधुमेह आणि रक्तदाब यांचीही माहिती असावी. याआधी जर त्यांच्यावर कुठली शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्याचीही माहिती कार्डावर असावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशी संपूर्ण माहिती कार्डवर असेल, तर कार्ड स्वाईप केल्यावर ताबडतोब ज्येष्ठ नागिराकंच्या आरोग्याची माहिती मिळेल अशी योजना आहे.

या कार्डची किंमत ५०० रुपये आहे. पण अनेकदा ज्येष्ठ नागरिकांकडे पुरेसा पैसा नसतो. निवृत्त असल्यामुळे अनेकांना पुरेसं उत्पन्न नसतं. त्यामुळे या कार्डाचा खर्च सरकारनेच उचलायला हवा, अशी मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 18, 2013, 19:58


comments powered by Disqus