ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम, Heavy Rain in Mumbai, late trains

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे. १० ते १५ मिनिटे हार्बर आणि मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर दिवा येथे कोकणकन्या गाडीचे इंजिन फेल झाल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दिवा येथे कोकणकन्या गाडीचे इंजिन फेल झाल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गितांजली, भुसावळ या एक्सप्रेस गाड्या अडकल्यात आहेत. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने याचा परिणाम मुंबईतील रेल्वे सेवेवर झालाय. दरम्यान, नवी मुंबई तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई लोकलवर परिणाम दिसून येत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. हिंमाता, भोईवाडा भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत.

ठाण्यात पावसाची संततधार कायम राहिल्याने वंदना टॉकीज , महाराष्ट्र विद्यालय , कोर्टनाका, गोखले रोड, शिवाईनगर, कोपरी आदी भागात पाणी साचले होते. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंब्रा स्टेशनबाहेरील हनुमान मंदिर भागातही पाणी साठले. तर रविवारी कळव्यात बुधाजीनगर भागात घरांवर वृक्ष कोसळला. अंबरनाथ शिवाजी चौकातील पार्किंग प्लाझाच्या कामासाठी उभारण्यात आलेले संरक्षक पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडाल्याने गोंधळ निर्माण झाला.

नैऋत्य मान्सूनने आपली वाटचाल कायम ठेवत राज्याचा ९० टक्के भाग व्यापला आहे. मान्सून आता वेरावळ, सुरत जळगाव, अमरावती, चंद्रपूर, जगदाळपूर, पूरी, कोलकाता, जलपायगुरी आणि गंगटोकपर्यंत पोहोचला आहे. रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोकण आणि गोव्यात, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाने झोडपले.
तसेच ईशान्येकडील राज्यांत, सब हिमालयीन पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम मध्यप्रदेश, अंदमान, निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 10, 2013, 07:53


comments powered by Disqus