Heavy rain in Mumbai, मुंबईत पावसाची हजेरी

मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस

मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस
www.24taas.com,मुंबई

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. रात्रिपासूनच पावसाची संततधार सुरू असल्य़ानं पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय.

अधेंरी पौस्ट ते मार्केट परिसरात पाणी साचलं असून गोरेगावच्या महानंद डेरी सिद्धार्थ हॉसेपिटल परिसरालाही फटका बसलाय. तर शहरातील सर्वच भागांसह, उपनगरातही सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पावसामुळे हिंदमाता, दादर, परळ, भायखळा, पवई, गोरेवामध्ये महानंदा डेअरी परिसर यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे.मुंबई शहर परिसरात गेल्या २४ तासात ३९.९ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ५८.७० मिलीमीटर आणि पश्चिम उपनगर ६७.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. हार्बर मार्गावर पाच ते सहा मिनिटे गाड्या उशीराने धावत आहेत. मात्र इस्टर्न-वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील वाहतूक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धीम्या गतीने सुरु आहे.

First Published: Tuesday, September 11, 2012, 10:45


comments powered by Disqus