एलफिन्स्टनच्या नमन टॉवरHeavy smoke coming out of Naman Mid-Town office building in Elphinstone Road

एलफिन्स्टनच्या नमन टॉवरला आग

एलफिन्स्टनच्या नमन टॉवरला आग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

नमन टॉवरला मोठी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीच्यावेळी चार ते पाच जण अडकले होते. तर आगीच्यावेळी पाच ते सहा जणांनी आपली सुटका करुन घेतली. त्यामुळे आगीच्या दुर्घटनेत जिवितहानी टळली.

आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या आगीमुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. आज शनिवार आणि रविवारीची सुट्टी असल्याने टॉवरमध्ये वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 21, 2014, 20:36


comments powered by Disqus