मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!, high alert in mumbai

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्वातंत्र्यदिन आणि येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. पोलिसांनी शहरात सुरक्षाव्यवस्था कडक केलीय.

रात्रभर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संशयास्पद व्यक्तींची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातल्या पोलिसांची नजर असणार आहे. काही भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनही सुरू करण्यात आलंय. चौकाचौकात नाकाबंदी करण्यात येतेय. समुद्र किनाऱ्यांवरही करडी नजर ठेवण्यात येतेय.

गणेशोत्सव समन्वय समितीच्या पोलीस संपर्कात असून त्यांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 10:49


comments powered by Disqus