नमोंचा उमेदवारी अर्ज, वाराणसीत रोडशो, जनसागर रस्त्यावर

Last Updated: Thursday, April 24, 2014, 16:17

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संशोधकांनी उल्टा दिसणारा ग्रह शोधला

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:21

खगोलशास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावलाय. जवळपास 2600 प्रकाश वर्ष दूर पहिल्यांदा `सेल्स लेंसिंग वायनरी स्टार सिस्टम`मध्ये दिसायला उल्टा असा ग्रह शोधलाय.

नार्वेकरांचा विरोध आणि उद्धव ठाकरेंची तपासणी

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 11:05

महायुतीमधील शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार रवी गायकवाड यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जात असताना, उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याचा प्रयत्न एका पोलिस अधिकार्‍याने केला.

अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर सणसणीत टीका

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 15:13

निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध मनसे यांचा वाद रंगतोय. या वादात आता शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेल्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने उडी घेतली आहे.

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

Last Updated: Saturday, November 2, 2013, 09:02

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.

दुनिया वही, सोच नई....(अनुभव)

Last Updated: Friday, November 1, 2013, 20:31

परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..

उठा उठा सकळीक, दिवाळी आली!

Last Updated: Friday, November 1, 2013, 17:10

दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.

सरकारच्या छुप्या आशीर्वादाने साखर कारखान्यांची मुजोरी

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:29

राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:20

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 22:09

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:10

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

Last Updated: Monday, August 19, 2013, 18:10

सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:49

स्वातंत्र्यदिन आणि येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. पोलिसांनी शहरात सुरक्षाव्यवस्था कडक केलीय.

उत्सवांवर दहशतवादाचं सावट, मुंबईत 'हाय अलर्ट'!

Last Updated: Monday, August 12, 2013, 18:51

मुंबईत १५ ऑगस्ट आणि सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय..सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात..दहशतवाद्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारताय येत नाही...

`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`

Last Updated: Monday, July 15, 2013, 09:06

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.

…असा रंगला रिंगणाचा सोहळा!

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 10:33

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.

आज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...

Last Updated: Monday, July 8, 2013, 12:29

आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.

सणसणीत कानाखाली!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 15:45

“यापुढे सिनेमात महिलांना थोबाडीत मारायची दृश्यं दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...” असिस्टंटने शुभवर्तमान कळवलं. बातमी सांगताना त्याचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा झाला होता.

वाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 08:49

राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.

अलिया भट्टच्या सणसणीत कानाखाली!

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 20:13

बॉलिवूडची नवी नाजूक,गोड स्टार अलिया भट्ट हिला नुकतीच एक सणसणीत कानाखाली खावी लागली. दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी असलेल्या अलिया भट्टने २०१२मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बी.एससी.च्या विद्यार्थ्याने लिहिली पेपरमध्ये उत्तरांऐवजी गाणी!

Last Updated: Thursday, February 7, 2013, 18:56

परीक्षा म्हटलं सर्वांनाच टेन्शन येतं. खूप अभ्यास करून पेपर लिहिण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात. मात्र औरंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यांनं काहीतरी वेगळाच प्रयत्न केलाय.

दिल्ली गँगरेप : ‘तो’ अल्पवयीन नाही!

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 10:50

गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी बसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन नाही, हे आता सिद्ध झालंय.

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

Last Updated: Friday, November 2, 2012, 16:53

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

अमृत की विष?

Last Updated: Monday, October 22, 2012, 21:40

‘फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच FSSAI नं देशभरातून दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. तेव्हा अत्यंत खळबळजनक माहिती उघड झालीय. FSSAI ने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केलीय.

चला आता शॉक बसणार, वीजदरही वाढले

Last Updated: Thursday, August 16, 2012, 21:40

महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्‍ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे.

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:28

अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पिंकी प्रामाणिकचे झाले लिंग परीक्षण!

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 19:16

बलात्कार आणि पुरूष असल्याची आरोपी असलेल्या आशिया खेळात सुवर्ण पदक जिंकणारी पिंकी प्रामाणिकचे मंगळवारी लिंग निर्धारण परीक्षण करण्यात आले. पिंकीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठ़डीत तिची रवानगी करण्यात आली आहे.

अमेरिकेचे न्यायधीश असणार भारतीय...

Last Updated: Thursday, June 14, 2012, 08:23

भारतातील अनेक तरूण गलेलठ्ठ नोकरी व्यवसायासाठी अमेरिकेची कास धरतात. मात्र आता अमेरिकेत भारतीय तरूणाने आपला ठसा उमटवला आहे..

मधुमेहाच्या तपासणीसाठी 'कॉन्टॅक्ट लेन्स'

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 10:55

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स... विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.

कोल्हापुरात तज्ज्ञ करणार रस्त्यांची पाहाणी

Last Updated: Saturday, May 26, 2012, 09:55

कोल्हापूरमध्ये आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी तज्ञांची समिती कोल्हापूरात दाखल झाली आहे. रस्त्याची पाहणी करण्यापूर्वी टोलविरोधी कृती समितीने आपली मतं या समितीपुढे मांडली.

...अन् अण्णाही आता थकले !!!

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 17:22

राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्य व्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदूरबारचा नियोजित दौरा रद्द केला आहे. अण्णांना थकवा जाणवू लागल्य़ानं त्यांनी नंदूरबारला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

'सलमान-शाहरुख' एकत्र दिसणार?

Last Updated: Thursday, May 10, 2012, 21:25

बॉलिवूडमधले दोन खान एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी फारच दुर्मिळ गोष्ट. पण, लवकरच ही संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. हो, आपण बोलतोय सलमान आणि शाहरुखबद्दल.

चांदींची मूर्ती गाभाऱ्यात बसणार?

Last Updated: Thursday, May 3, 2012, 18:36

दिवेआगर येथील चोरीला गेलेली मुर्ती मिळू शकली नाही अशा परिस्थितीत असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेला देवाचा गाभारा रिकामा राहु नये यासाठी पुण्यातील जितेंद्र घोडके सराफ यांनी त्यांच्याकडील गणपतीची मुर्ती दिवेआगरला भेट म्हणून देणार आहेत.

काय असणार 'गुलाम बेगम बादशाहा'मध्ये

Last Updated: Thursday, April 5, 2012, 13:28

सिनेमासाठी लूक चेंज करणं हा ट्रेंड आता मराठी सिनेसृष्टीतंही रुजू लागला आहे. आता नव्याने येत असलेल्या 'गुलाम बेगम बादशाह' या सिनेमाबद्दलच पाहा ना. या सिनेमात संजय नार्वेकर आणि नेहा पेंडसे यांनी आपला लूकच चेंज केला आहे.

आता रिक्षात ई-मीटर बसणारच...

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 00:08

राज्यात २ एप्रिलपासून रिक्षांना ई-मीटर बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे मनमानी भाडे आकारणीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. परिवहन विभागानेही हे मीटर प्रवाशांच्या फायद्याचे असल्याचं म्हटलं आहे.

मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला

Last Updated: Friday, March 23, 2012, 15:59

आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.

शोभायात्रा शान मुंबईची.. मान मराठीचा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 16:27

गुढीपाडवा म्हणजे शोभायात्रा असं समीकरण बनलेल्या मुंबईतील तरूणाई गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होते. तर मुंबईत कुठे - कुठे शोभायात्रा आणि पाडव्यानिमित्त कार्यक्रम असणार हे आपल्यासाठी www.24taas.com वर उपलब्ध.

सामान्यांसाठी चांगलं असणार बजेट - रेल्वेमंत्री

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 11:44

संसदेत रेल्वे बजेट मांडण्यापूर्वी आज रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'सामान्यांसाठी हे रेल्वे बजेट चागंल असणार आहे'. (आम आदमी के लिए रेल बजेट अच्छा होगा) या शब्दात त्यांनी आपलं मत माडलं.

आता बैलांच्या शर्यतीला 'कोर्टाची वेसण'

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 17:50

ग्रामीण भागात मनोरंजन आणि परंपरेच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यंतीवर सरसकट बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जुलै २०११मध्ये केंद्र सरकारनं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती.

काय असणार शरद पवारांची नवी खेळी?

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:37

अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हजर राहणार आहेत त्यामुळं नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

'डोलची'शिवाय नाही धुळ्यातली धुळवड

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:56

धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खानदेशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.