लग्नाची तयारी, जामिनावर सुटला बलात्कारी! High court gives bail to Rapist for wedding

लग्नाची तयारी, जामिनावर सुटला बलात्कारी!

लग्नाची तयारी, जामिनावर सुटला बलात्कारी!
www.24taas.com, मुंबई

ज्या मुलीवर बलात्कार केला, तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामिन दिला आहे. आधी बलत्कार केल्यावर तुरुंगात गेलेल्या २० वर्षीय तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने त्याला हायकोर्टाने जामिन दिला आहे.

एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याबद्दल सदानंद या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र बलात्कारी तरुण हा आपला प्रियकर असून परस्पर संमतीनेच आमचा शरीरसंबंध घडला होता, अशी कबुली पीडित तरुणीने दिली. एवढंच नव्हे, तर आमचे लहानपणापासून संबंध असल्याचं मुलीने म्हटलं आहे.


मुलीच्या पोटात असणाऱ्या बाळाची जबाबदारी सदानंदने स्वीकारण्याची तयारी दर्शवली. एकमेकांबरोबर प्रेमाने संसार करण्याची इच्छाही दोघांनी दाखवल्यामुळे हायकोर्टाने तरुणाप्रती सहानुभूती दाखवत चक्क त्याला जामीन दिला आहे.

First Published: Monday, May 6, 2013, 16:06


comments powered by Disqus