पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट

Last Updated: Saturday, May 24, 2014, 19:51

आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.

दिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 15:40

दिल्लीमध्ये एक सीरियल रेपिस्टचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील वसंता नावाच्या एका कुख्यात गुंडाने आपण सीरियल रेपिस्ट असून, गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केलंय. वसंता हा दिल्लीतील ५७ वर्षीय एक कुख्यात गुंड असून, त्याच्यावर या आधीही बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि चोरी करणे असे गुन्हे दाखल कतण्यात आले होते.

बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी- मुलायम

Last Updated: Friday, April 11, 2014, 08:52

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.

राज ठाकरेंविरोधात वॉरंट

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:29

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:15

मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.

मुंबई गँगरेप: ‘त्या’ नराधमांचा आणखी एक गुन्हा उघड

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 13:30

मुंबई बलात्कार प्रकरणातल्या पाच आरोपींविरोधात आणखी एक तक्रार दाखल झालीय. एका महिलेनं शक्ती मिलमध्येच ३१ जुलैला आपल्यावर गँगरेप झाल्याची तक्रार दाखल केलीय. ना. म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलीनं गँगरेपप्रकरणातल्या तीन आरोपींना ओळखलंय.

मुंबई गँगरेपचाही एक आरोपी अल्पवयीन?

Last Updated: Sunday, August 25, 2013, 22:52

मुंबई गँगरेप प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल सत्तार उर्फ चांद बाबू याच्या वयावरुन एक नविन अडचण समोर येऊन उभी ठाकलीय. आरोपीच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी हा अल्पवयीन आहे.

बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं पंचायतीचं फर्मान

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:47

उत्तर प्रदेशातील इटावा गावात खाप पंचायतीने बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं फर्मान काढलं आहे. या गोष्टीला मानवाधिकार संघटनेचे लोक विरोध करत आहेत. मात्र पंचायतवाले आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

लग्नाची तयारी, जामिनावर सुटला बलात्कारी!

Last Updated: Monday, May 6, 2013, 16:06

ज्या मुलीवर बलात्कार केला, तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामिन दिला आहे. आधी बलत्कार केल्यावर तुरुंगात गेलेल्या २० वर्षीय तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने त्याला हायकोर्टाने जामिन दिला आहे.

आया-बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात-पाय कलम करा - राज

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 15:15

`आमच्या आया-बहिणींवर हात टाकणाऱ्या या परप्रांतियांचे हात-पाय तिथल्या तिथे तोडून टाका` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर ठाकरी शैलीत प्रहार केला.

बलात्कारी डॉक्टरला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 16:27

उपचारासाठी दाखल असलेल्या ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आंदोलनाने दिलं `ती`ला बळ, पंजाबमधला बलात्कारी गजाआड

Last Updated: Sunday, December 30, 2012, 16:44

दिल्लीतील पीडित मुलीने जागृकतेची मशाल संपूर्ण देशात पेटवली त्याचे परिणाम देशभरात जाणवू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका विद्यार्थीनीवर बलात्कार करून आरोपी मोकाट होता. विद्यार्थीनीने दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अल्टिमेटम दिल्यानंतर आखेर आरोपीला पोलिसांनी गजाआड केलंय.

बलात्काऱ्यांना तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही

Last Updated: Friday, December 28, 2012, 21:57

आता बलात्कारांना समाजापासून तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही, कारण आता बलात्काराच्या आरोपात दोषी आढळलेल्या व्यक्तींचे फोटो बेवसाईटवर जाहीर करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलाय.

मुलगा दोषी असेल तर फाशी द्या - वडील

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:38

वसंत विहार सामूहिक बलात्कार प्रकरणी जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला फाशीच द्या, अशी मागणी संशयीत आरोपी विनयचे वडील हरी राम यांनी आपली प्रतिक्रिया देताना केली. दरम्यान, पिढीत मुलीची स्थिती अधिक नाजूक आहे.