Last Updated: Wednesday, March 13, 2013, 21:18
www.24taas.com, मुंबईमहापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. महापालिकांनी यावर तात़डीनं कारवाई करावी आणि 24 तासांत याचा अहवाल सादर करावा असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत. मुंबईव्यतिरिक्त नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पुणे या सहा महापालिकांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.
एका सामाजिक संस्थेने केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत. ही होर्डिंग्ज २४ तासांच्या आत न हटवल्यास महापालिका आयुक्तांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. या होर्डिंग्जवर ज्यांचे फोटो असतील, त्यांना नोटिस बजावण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
मात्र या आदेशाचा वापर करत विरोधक राजकारण करण्याचीही शक्यता आहे. एखाद्या नेत्यावर कारवाई व्हावी, यासाठी विरोधकच संबंधित नेत्यांची अनधिकृत होर्डिंग्ज लावण्याचीही शक्यता आहे.
First Published: Wednesday, March 13, 2013, 21:18