उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

सोलापूर महापालिकेची होर्डिंग्ज हटाव मोहीम!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 12:24

सोलापूर महानगरपालिकेनं ५०० पोलिसांच्या मदतीनं शहरातल्या अवैध डिजिटल होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केलीय. ही मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली.

होर्डिंग्जवर भाजप-सेनेत जुंपली!

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 21:22

भाजप मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु पाहतंय.... म्हणूनच महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपनं मुंबईभर होर्डिंग्ज लावलीयत. आणि युती सरकारच्या काळात केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय.

आयपीएलच्या होर्डिंगसाठी झाडांचा बळी!

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 18:22

आयपीएलचे होर्डिंग्ज दिसण्यासाठी बीएमसीच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं चक्क झाडांच्या फांद्या तोडल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

होर्डिंग्जबाजीला हायकोर्टाचा चाप

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 21:18

महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. महापालिकांनी यावर तात़डीनं कारवाई करावी आणि 24 तासांत याचा अहवाल सादर करावा असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत.

नाशिकमधल्या `होर्डिंग्ज`वर संक्रांत

Last Updated: Thursday, December 13, 2012, 19:45

नाशिक महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डींग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यंदा तर आजचा अल्टीमेटम दिला असून यापुढे फलकबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय.

दादांचं फर्मान, होर्डिंग्ज निघाले गपगुमान!

Last Updated: Thursday, June 28, 2012, 22:59

राजकारण्यांनी अडथळा आणला नाही आणि प्रशासनानं ठरवलं तर काय होऊ शकतं, याचं चांगलं उदाहरण पुण्यात समोर आलंय. पुण्यातले फ्लेक्स काढून टाकण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करताच एका दिवसात हजारोंच्यावर फ्लेक्स आणि होर्डींग्स उतरवण्यात आली.

बसच्या खिडकीला नाही जाळी, मुलाचा गेला बळी

Last Updated: Thursday, November 24, 2011, 05:15

बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. सायनमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या या दुर्घटनेत एका ८ वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागलाय. विराज परमार असं या मुलाचं नाव आहे.