होर्डिंग्जवर भाजप-सेनेत जुंपली!, hoardings war in bjp-shiv sena

होर्डिंग्जवर भाजप-सेनेत जुंपली!

होर्डिंग्जवर भाजप-सेनेत जुंपली!

www.24taas.com, झी मीडिया, भाईंदर
भाजप मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु पाहतंय.... म्हणूनच महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपनं मुंबईभर होर्डिंग्ज लावलीयत. आणि युती सरकारच्या काळात केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय.


उड्डाणपूल भाजपनंच बांधले, सीलिंकची कल्पनाही भाजपचीच होती, विमानतळाला शिवरायांचं नाव भाजपनंच दिलं, असे दावे या पोस्टरबाजीतून करण्यात आलेत. भाजपच्या या पोस्टरबाजीवर शिवसेना मात्र नाराज आहे.

भाजपनं डिवचल्यावर शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय. युती सरकारच्या काळातल्या कामाची प्रेरणा बाळासाहेबांचीच होतीविमानतळाला शिवरायांचं नाव देण्यासाठी शिवसैनिकांना लाठ्या खाल्ल्या, आणि जनता कामांवर विश्वास ठेवते, होर्डिंग्जवर नाही. असं खणखणीत प्रत्युत्तर शिवसेनेनं दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 10, 2013, 21:22


comments powered by Disqus