Last Updated: Sunday, August 4, 2013, 10:45
www.24tass.com, झी मीडिया, मुंबई केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर आज दुपारी शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर जवळपास दहा दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय.
सुशील कुमार शिंदे यांनी शनिवारी वरळीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत एका इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, August 4, 2013, 10:45