पेशंट्समुळे हॉस्पिटलला धोका? Hospital has threat from Patients!

पेशंट्समुळे हॉस्पिटलला धोका?

पेशंट्समुळे हॉस्पिटलला धोका?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलबाहेर राहणा-या पेशंटना हटविण्यासाठी मुंबई पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवलंय. या पेशंटमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षेला धोका असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

रुग्णालयाबाहेर असलेले भिकारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये काही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं रुग्णालयाबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच रुग्णालयाबाहेर असलेले तंबू हटवण्याबाबत पोलिसांनी बीएमसीला पत्र पाठवल्याचं वरिष्ठ निरीक्षक सुनील तोंडवळकर यांनी म्हटलंय.

तसंच या रुग्णांची आणि त्यांच्या नातलगांची योग्य सोय करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावं, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 1, 2013, 22:48


comments powered by Disqus