मुंबईकर तरूणीचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई थांबली

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 13:45

मुंबईकर तरूणीचा जीव धोक्यात होता पण तिचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई शहर काही काळासाठी थांबल आणि त्या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा एक माणुसकीचे जीवंत उदाहरण चेन्नईकरांनी जगाला दाखवून दिलं आहे.

मुंबईत रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाचा हत्या

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 14:58

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने केलेल्या हल्ल्यात दुसरा रुग्ण ठार झालाय. या हल्ल्यात आणखी दोन रुग्ण जखमी झालेत. याप्रकारामध्ये हॉस्पिटलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 09:43

महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.

राजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 22:19

मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर गेलेत. सोमवारी रात्री एका रुग्णाने डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.

धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त

Last Updated: Saturday, December 21, 2013, 13:43

एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.

मुंबईतील वास्तववादी घटना...अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत

Last Updated: Thursday, December 12, 2013, 13:19

आजच्या २१ शतकातील वास्तवादी घटना मुंबईत घडली. अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुमच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार या रूग्णाच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. मात्र, हा रूग्ण जिवंत झाला.

वॉर्डबॉयने मारली वृद्ध महिलेच्या कानाखाली!

Last Updated: Monday, October 7, 2013, 23:13

नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयात आयसीयुमधल्या एका वयोवृद्ध महिला रुग्णाला वॉर्डबॉयनं थोबाडीत मारलीय.

मुंबई गँगरेपमधील आरोपीने टीबी पेशंट महिलेलाही सोडले नाही!

Last Updated: Friday, September 6, 2013, 15:37

मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींचे नवीनवीन कारनामे पुढे येताय आहे. या सहा आरोपींपैकी एक सिराज रेहमान यानं धोबीघात परिसरातल्या एका टीबी पेशंट महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या महिलेनं वेळीच आरडाओरडा केल्यानं पुढला प्रसंग टळला.

मुंबईत रूग्णांना मिळणार शिरा, उपमा

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 10:40

मुंबईत रूग्णांना शिरा, उपमा किंवा पराठा मिळणार आहे. डॉक्टरांपाठोपाठ आता रुग्णांनाही सकाळची न्याहरी देण्यात येणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा होऊन घेण्यात आलाय.

पेशंट्समुळे हॉस्पिटलला धोका?

Last Updated: Thursday, August 1, 2013, 22:48

मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलबाहेर राहणा-या पेशंटना हटविण्यासाठी मुंबई पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवलंय. या पेशंटमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षेला धोका असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

राज्यात साथीच्या रोगराईचं थैमान

Last Updated: Thursday, July 11, 2013, 15:40

ऐन पावसाळ्यात राज्यात रोगराईचं थैमान सुरु झालय. मुंबईत साथीच्या आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ६०० जणांना लागण झालीये.

हॉस्पिटलचं झालं तळ, रुग्णांना धोका

Last Updated: Monday, June 17, 2013, 15:42

मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला बसलाय. या पावसामुळे हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरलंय. हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या या पाण्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडालीय.

मुंबईत डॉक्टरने केला रूग्ण तरूणीवर बलात्कार

Last Updated: Sunday, May 19, 2013, 12:52

मुंबई उपनगरात एक धक्कादायक घटना घडली. उपचार घेण्यासाठी आलेल्या एका २६ वर्षीय तरूणीवर डॉक्टरने बलात्कार केला.

नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं

Last Updated: Thursday, May 9, 2013, 18:00

वाढत्या तापमानासोबत नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय.

माशाचं तेल डायलिसिसच्या रुग्णांसाठी गुणकारी

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 23:26

माशांच्या तेलात आढळणारे ओमेगा ३ हा अम्ल डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचा बचाव करते. डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांना हृदयाचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून मास्याचे तेल वाचवते.

अॅसि़डिटी झाली म्हणून एन्जिओप्लास्टी केली...

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 10:45

एसिडीटी झाली म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालात आणि तिथल्या डॉक्टरांनी तुमच्यावर थेट एन्जिओप्लास्टी केली तर... बसला ना धक्का! पुण्यातील तेजिंदरसिंग अहलुवालिया यांच्यावर हा प्रसंग गुदरलाय

HIV बाधित रूग्णांचे रक्त डोळ्यात उडालं, काय होणार?

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 13:26

शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे.

ठाण्यात रुग्णालाच काढले हॉस्पिटलबाहेर

Last Updated: Friday, March 30, 2012, 08:06

अपघातात ५० टक्के भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पिटलबाहेर काढल्याचा धक्कादाक प्रकार ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात घ़डला आहे. दुस-या एका रुग्णाला जागा हवी आहे म्हणून भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पीटलबाहेर काढल्याचं कारण देण्यात आले.

'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !

Last Updated: Friday, January 6, 2012, 21:23

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.

केरळात एचआयव्ही-एडस बाधितांना पेन्शन

Last Updated: Thursday, December 1, 2011, 04:15

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. केरळ राज्य सरकारने एआयव्ही-एडसने बाधितांसाठी दर महिना ५२० रुपयांचे पेन्शन जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचं पत्रकारांना सांगितलं.