आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज` ICICI bank gives good news

आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`

आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.

व्याज दरात तर ०.१० टक्कयांची कमतरता करण्यात आलेलीच आहे, तसेच आयसीआयसीआय बँकेकडून ७५ लाखाचे गृह कर्ज आता १०.१५ टक्क्यांवर मिळणार आहे. पहिला हेच कर्ज १०.२५ टक्क्यांवर मिळत होतं.

आयसीआयसीआय बँकेतर्फे महिलांना व्याज दरात विशिष्ट सूट मिळणार आहे. महिलांना ७५ लाखाचे गृह कर्ज १०.१० टक्क्यांवर मिळणार आहे. बँकेची ही स्कीम ३० जूनपर्यंतच्या सॅन्शन केलेल्या कर्जावर राहिल.

या घोषणेनंतर आयसीआयसीआय बँकेचे गृह कर्जाचे दर आता एसबीआयच्या बरोबर आले आहेत. एसबीआय देखील ७५ लाखाचे गृह कर्ज १०.१५ टक्के व्याजावर देतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 17:26


comments powered by Disqus