सिंधरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू! INS Sindhurakshak LIVE: All crew members dead, confirms Navy Ch

सिंधुरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू!

सिंधुरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच मुंबईत भीषण नौदल दुर्घटना घडली आहे. नौदलाची 16 वर्ष जुनी सिंधूरक्षक या पाणबुडीमध्ये जबर स्फोट होऊन विध्वंसक आग लागली. आगीमुळे ही पाणबुडी बुडाली असून, त्यावरील तीन अधिका-यांसह 15 नौसेनिंकांचा मृत्यू झालाय. मुंबईत नौदल डॉकयार्डमध्ये झालेल्या या दुर्घटनेमागे घातपात तर नाही ना... याची चौकशी नौदलाने सुरू केलीय.

कुलाब्याच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास सिंधूरक्षक पाणबुडीला आग लागल्याचं वृत्त पसरलं आणि एकच खळबळ उडाली. मोठमोठाल्या आगीच्या ज्वाळा अवकाशात दिसू लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

आग इतकी भीषण होती की नौदलाचे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले. तात्काळ मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवळपास दीड डझन बंब गाड्यांना पाचारण करण्यात आलं.. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, पण त्याआधीच शेजारी उभ्या असलेल्या सिंधूरत्नसारख्या पाणबुड्यांनाही आगीची झळ पोहोचली... आगीमुळं 500 कोटींच्या सिंधूरक्षकला कायमची जलसमाधी मिळाली. या पानबुडीवरील तीन वरिष्ठ नौदल अधिका-यांसह 15 नौसैनिकांचा मृत्यू झालाय.


1971च्या पाकिस्तानं युद्धानंतर आयएनएस खुकरी पानबुडीला लागलेल्या आगीनंतर ही आतापर्यंतची नौदलातली सर्वात मोठी दुर्घटना आहे. सिंधूरक्षकला लागलेल्या आगीची कारणं अद्याप गुलदस्त्यातच आहेत. नेमकी स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी ही दुर्घटना घडल्यानं घातपाताचाही संशय व्यक्त केला जातोय.

दुर्दैवाची बाब म्हणजे सिंधूरक्षक पाणबुडीवरील ही पहिली दुर्घटना नाहीय. यापूर्वी फेब्रुवारी 2010 मध्ये ती विशाखापट्टणला असताना अशीच आग लागून त्यामध्ये एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला होता. अलिकडेच कोट्यवधी रूपये खर्च करून रशियामध्ये या पाणबुडीची डागडुजीही करण्यात आली होती... पण त्यानंतरही एवढी मोठी दुर्घटना घडल्याने सिंधूभक्षक कोण, असा सवाल निर्माण झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 17:08


comments powered by Disqus