नौसैनिकांच्या ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी, INS Sindhurakshak tragedy: 3 bodies recovered, survivors unlikely

नौसैनिक ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी

नौसैनिक ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिंधुरक्षक पाणबुडीतून ३ मृतदेह मिळालेत. तीनही मृतदेह वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्या डीएनए चाचणीसाठी ते आयएनएस अश्विनी इथे पाठवणण्यात आलेत. पाणबुडी आणि या मृतदेहांची अवस्था पाहता इतर १५ जण जिवंत असण्याची शक्यता धूसर वाटत असल्याचं नौदलाने स्पष्ट केलंय.

सिंधुरक्षक पाणबुडीचं बचावकार्य सुरू आहे. त्यातून जी भिती होती ती खरी होत असल्याचं चित्र आहे. अडकलेल्या १८ नौसैनिकांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. १४ ऑगस्टला झालेल्या स्फोटांनंतर पाणबुडी पाण्यात बुडाली होती. त्यावेळी त्यात १८नौसैनिका होते. यात ३ अधिकारी आणि १५ नौसैनिक होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह मिळालेत.

नेव्हीचे डायव्हर्स शोधकार्याचे प्रयत्न करत आहेत. पाणबुडीत उकळतं पाणी असल्यामुळे त्याच्या आत जाणं शक्य होत नव्हतं. त्यातच जॅम झालेले दरवाजे आणि प्रवेश मार्ग यांमुळे पाणबुडीच्या आतल्या भागात पोहोचणं शक्य होत नव्हतं. त्यातच चिखलमिश्रीत पाणी पाणबुडीच्या आत शिरल्यामुळे हायपॉवर अंडरवॉटर लाईट्सचा वापर करूनही शोध घेता येत नव्हता. त्यामुळे दोन दिवस उलटले तरीही अपेक्षित यश आलं नव्हतं.
डायव्हर्सच्या अखंड ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर सेकंड कंपार्टमेंटमध्ये शिरणं शक्य झालंय. तीनही मृतदेह सेकंड कंपार्टमेंटमध्ये मिळालेत. या मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. पुढच्या तपासासाठी ते आयएनएस अश्विनीला पाठवण्यात आलेत. उरलेल्या १५ जणांचा तपास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सिंधुरक्षक पाणबुडीतून दोन नौसैनिकांचे मृतदेह मिळालेत. नौदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिलीये. १४ ऑगस्टला सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर बेपत्ता १८ नौसैनिकांचा शोध सुरू आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीवर जिवंत मिसाईल्स असल्यानं धोका अजूनही टळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून बाकीच्या युद्धनौका नौदल डॉकयार्डबाहेरच्या समुद्रात पार्क करण्यात आल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 16, 2013, 12:25


comments powered by Disqus