ना आँख दिखाएंगे- ना झुकाएंगे; 'विक्रमादित्य'वर पंतप्रधान स्वार

Last Updated: Saturday, June 14, 2014, 18:08

नौदलाच्या सामर्थ्याचा घेणार आढावा घेण्यासाठी आणि ही युद्धनौका नौदला समर्पिक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी INS विक्रमादित्यवर दाखल झालेत. त्यांनी यावेळी युद्धनौकेची पाहाणी केली.

`विक्रांत` भंगारात! ६० कोटींना लिलाव...

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 13:22

आयएनएस विक्रांतची लिलावामध्ये ६० कोटींना विक्री करण्यात आल्याची माहिती नौदलातल्या सूत्रांनी दिलीय. `पीटीआय`नं याबाबतचं वृत्त दिलंय.

INS कोलकाता युद्धनौकेत स्फोट, एका अधिकाऱ्याचा मृत्यू

Last Updated: Friday, March 7, 2014, 16:31

मुंबईमध्ये माझगाव डॉक इथं आयएनएस कोलकाता जहाजामध्ये स्फोट झालाय. माझगाव डॉकच्या यार्ड ७०१ मध्ये गॅस गळतीमुळं हा स्फोट झालाय. यामध्ये एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, काही माझगाव डॉक कर्मचारी जखमी झालेत. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.

`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 13:10

देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.

‘आयएनएस विक्रांत’चा होणार `ऑनलाईन लिलाव`!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 10:14

आयएनएस विक्रांत... एकेकाळी भारतीय समुद्रावर राज्य केलेली ही युद्धनौका... भारताचा अभिमान असलेल्या या नौकेचा शेवट मात्र दुर्दैवी होणार आहे.

अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल

Last Updated: Saturday, November 16, 2013, 22:43

खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.

‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:43

भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.

नौसैनिक ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:46

सिंधुरक्षक पाणबुडीतून ३ मृतदेह मिळालेत. तीनही मृतदेह वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्या डीएनए चाचणीसाठी ते आयएनएस अश्विनी इथे पाठवणण्यात आलेत. पाणबुडी आणि या मृतदेहांची अवस्था पाहता इतर १५ जण जिवंत असण्याची शक्यता धूसर वाटत असल्याचं नौदलाने स्पष्ट केलंय.

सिंधुरक्षक दुर्घटना : तीन नौसैनिकांचे मृतदेह हाती

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:41

सिंधुरक्षक पाणबुडीतील बेपत्ता १८ नौसैनिकांपैकी दोन सैनिकांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहेत. अद्याप १६ नौसैनिकांचा शोध सुरू आहे.

`स्वदेशी` आयएनएस विक्रांतची खासियत!

Last Updated: Monday, August 12, 2013, 10:06

‘वॉरशीप’ कधीच नष्ट होत नाही, हे म्हणणं आहे भारतीय नौदलाचं... १९९७ साली भारतीय नौदलातून आयएनएस विक्रांत रिटायर्ड झालं होतं.

‘आयएनएस विक्रांत’चं जलावरण!

Last Updated: Monday, August 12, 2013, 14:33

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचं आज जलावतरण होणार आहे. यामुळे विमानवाहू युद्धनौका आखणाऱ्या आणि बांधणाऱ्या पहिल्या पाच देशांच्या समुहात भारताचा समावेश झालाय.

आयएनएस विंध्यगिरी नष्ट करणार

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 09:53

आयएनएस विंध्यगिरी नष्ट करायला मुंबई हायकोर्टानं परवानगी दिलीय सुमारे एक वर्षानंतर ही परवानगी देण्यात आलीय.३० जानेवारी२०११ रोजी आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती. मात्र विंध्यगीरीमुळे इतर जहाजांना धोका निर्माण झाला होता.

परचक्र भेदण्यास भारताची 'आयएनएस चक्र'

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 12:14

आयएनएस चक्र ही नवी अत्याधुनिक पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. ही पाणबुडी दाखल झाल्यामुळं नौदलाची ताकद कितीतरी पटीनं वाढणार आहे. वेगानं धाऊन शस्त्रूला चारीमुंड्याचित करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.