Last Updated: Sunday, May 19, 2013, 22:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील मतभेद आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी शिवाजी पार्क आणि आता रेसकोर्सच्या मुद्यावर सध्या सुरु असलेल्या घोळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय.
`रोखठोक` या आपल्या सामनामधील साप्ताहिक सदरात त्यांनी याबाबत सत्ताधाऱ्यांबरोबरच पक्षातल्या मवाळ गटालाही लक्ष्य केलंय. शिवाजी पार्क किंवा रेसकोर्सच्या मुद्यावर तोडीस तोड उत्तर देण्याऐवजी तडजोडीची भाषा का केली जाते? सरकारची मेहरबानी करुन स्मारकाची जागा पदरात पाडून घेतली जाते असे प्रकार आता होऊ नयेत असं म्हणत राऊत यांनी या लेखात बजावलंय.
संजय राऊत यांचं शिवसेनेच्या मवाळ गटावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेतले मतभेद समोर येऊ लागले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना मवाळ होत असल्याचं बऱ्याचदा बोललं जातं, हे त्याचंच द्योतक आहे असं दिसू लागलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 22:30