रेसकोर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेनेला आव्हान

Last Updated: Friday, June 21, 2013, 09:26

रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय. तसंच नालेसफाईमधील पैसा `मातोश्री`वर जात असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम

Last Updated: Monday, May 27, 2013, 20:42

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याची मागणी अपरिपक्व असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम हे नागपूरमध्ये असं म्हणाले.

शिवसेनेत मतभेद?

Last Updated: Sunday, May 19, 2013, 22:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील मतभेद आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी शिवाजी पार्क आणि आता रेसकोर्सच्या मुद्यावर सध्या सुरु असलेल्या घोळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय.

रेसकोर्सवर बाळासाहेबचं स्मारक व्हावं - सेना

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 15:08

महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं, अशी खुली मागणी आता शिवसेनेनं केलीय. रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं शिवसेनेनं म्हटलयं.

लोकांच्या जे हिताचं असेल, ते करा- राज

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 13:19

महालक्ष्मी रेसकोर्सबद्दल राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांच्या हिताचे जे असेल, तेच करावे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

महालक्ष्मी रेसकोर्स आता मुंबईकरांसाठी मोकळा!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 17:36

मुंबईतला महालक्ष्मी रेसकोर्सचा 99 वर्षांचा भाडेपट्टीचा करार 31 मे रोजी संपणार असल्यानं रेसकोर्सची जमीन बीएमसीनं ताब्यात घेण्याची मागणी महापौरांनी प्रशासनाकडं केली आहे.

पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलन

Last Updated: Sunday, July 29, 2012, 00:00

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.