Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.
जर एखादे वाहन रस्ता वापरत असेल तर त्याची किंमत टोल स्वरुपात दिलीच गेली पाहिजे असं मत जयंत पाटील ह्यांनी व्यक्त केलंय.
एसटी कर्मचा-यांच्या एका सत्कार कार्यक्रमात ह्यांनी हे वक्तव्य केलंय. यावर कर्मचारी संघटांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीये. कित्येक कोटींच्या तोट्यात असलेल्या एसटीला टोलमुळे दरवर्षी 100 कोटीपेक्षा जास्त रुपये भरावे लागतात. त्यामुळे एसटीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी एक उपाय म्हणून टोल माफ करणं आवश्यक असल्याचं संघटनेनं सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 21:59