टोलचा फटका एसटी महामंडळाला

Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:41

टोलनाक्यांमुळे राज्यभरात डोकेदुखी वाढली असताना आता, टोलचा फटका एसटी महामंडळाच्या नागपूर विभागालाही बसलाय. गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभाग तोट्यात आहे. तोट्याच्या रकमेपैकी जवळपास एक तृतीयांश रक्कम निव्वळ टोलसाठी खर्च होत असल्यानं एसटीचं चाक आणखी गाळात रूततंय.

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 12:17

आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.

एसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध

Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:59

एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.

कडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू

Last Updated: Thursday, February 6, 2014, 15:38

स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.

खुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 15:37

आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

नोकरीची संधी:कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 13:39

एसटीच्या चालक पदासाठी आठवी पासवरून दहावी पासची अट लागू केल्यानं एक वर्ष उलटलं तरी चालकांची संपूर्ण भरती होऊ शकली नाही. एसटीला कोकण विभागाचं सर्वाधिक टेन्शन असून, इथं चालक म्हणून कोणी पुढं येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं खास कोकण विभागासाठी चालक पदाची पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

कोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:27

काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.

गरिबांचा प्रवासही महागणार!

Last Updated: Friday, September 14, 2012, 09:44

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.